व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वानी निश्चय करावा
पोलिस निरीक्षक दिलीप भागवत : 31 डिसेंबर व्यसनमुक्त करण्याचा संकल्प
भुसावळ : व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्व समाज घटकाने पुढाकार घेवून निश्चय केल्यास व्यसन मुक्त समाज घडू शकतो, असा आशावाद बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी व्यक्त करीत या उपक्रमासाठी पोलिस विभाग सदैव सोबत असल्याचेही ते म्हणाले. भुसावळ पोलिस विभाग, भुसावळ शहर पत्रकार संघ, अश्विन सागर फौंडेशन, राष्ट्रीय ओडर्सम क्रांती, भुसावळ चालक मालक संघटना, मजूर व मोलकरीण संघटना तसेच सखी श्रावणी महिला बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विदयमाने आर्या फौंडेशनने 31 डिसेंबर व्यसनमुक्ति संकल्प दिवस राबविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. जनजागृतीसाठी रेल्वे स्टेशन परीसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शनिवार, 28 रोजी सायंकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी निरीक्षक भागवत बोलत होते.
यांची विचार मंचावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन सोनवणे, स्थानक संचालक जी.आर.अय्यर, लक्ष्मण तायडे, आर्याच्या डॉ.वंदना वाघचौरे, पत्रकार उज्वला बागुल, राजेश्री देशमुख, चंद्रकांत चौधरी आदींची उपस्थिती होती. प्रसंगी कार्यक्रमाचे व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आर्या फौंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे यांनी प्रास्तावि केले.



व्यसनातून बाहेर पडणे गरजेचे -मान्यवरांचा सूर
स्टेशन परिसरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती होणे अतिआवश्यक असून असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे अय्यर यांनी सांगितले. नशाबंदी मंडळ सचिव चंद्रकांत चौधरी व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड असून सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगितले. पत्रकार उज्वला बागुल यांनी व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून आजही बहुतांशी युवावर्ग व्यसनाच्या चक्रव्यूहात अडकत चालला आहे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे सांगितले. सखी श्रावणी महिला मंडळ अध्यक्ष राजेश्री नेवे यांनी व्यसन मुक्त युवा पीढी सशक्त देश घडवू शकेल, असे सांगत व्यसनांपासून दूर रहा, असे सांगितले. अश्विन सागर फौंडेशनचे अरुण तायडे यांनी पिणार्या व्यक्तीवर विदारक सत्य कथन करीत कविता सादर करून व्यसन म्हधजे एक शोकांतिका असल्याचे पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात जगन सोनवणे यांनी
व्यसनमुक्त पीढी घडवाची असेल तर समाजाने ही व्यसनमुक्ती अभियानात सहभागी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी ‘दारू नाही दूध प्या’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. सूत्रसंचलन राजेश्री देशमुख तर आभार शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार उज्वला बागुल यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी आर्या फाऊंडेशचे प्रशांत निकम, सुवर्णा इंगळे, सारीका गुरचळ, वैशाली सावळे, भुसावळ पोलिस विभाग, भुसावळ शहर पत्रकार संघ, रीक्षा चालक-मालक संघ, मजूर व मोलकरणी संघटना, लक्ष्मण टेंन्ट हाउस सुनील ठाकूर, उज्वला तायडे, राजेश देवपूजे, मोहन वाघ, राजेश धनगर, बी.वि.नाटेकर, गजानन चंराटे, अशोक कोळी यांनी परीश्रम घेतले.
