यावलमधील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा दीर्घ आजाराने मृत्यू
यावल : शहरातील डांगपुरा मोहल्यातील रहिवासी व सेवानिवृत्त प्रा.आर.एम. ेख (63) यांचे सोमवार, 30 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी आजारापणामुळे मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. आर.एम.शेख सर हे यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीव्दारे संचलित डॉ.झाकीर हुसैन उर्दु हायस्कुल व माध्यमिक विद्यालयात उपप्राचार्य म्हणुन सेवेत होते तर त्यांनी सामाजिक कार्यातदेखील आपले मोठे योगदान दिले आहे. मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व समाज सेवा मंडळ, यावल या संस्थांचे त्यांनी अध्यक्षपदही भुषविले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. प्रा.आर.एम.शेख यांच्यावर सायंकाळी डांगपुरा कब्रस्थानात दफनविधी (अंत्यसंस्कार) करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अलीम शेख आणि शिक्षक अमीन शेख यांचे ते वडील होत.

