खिर्डीच्या इसमाचा वीज पडल्याने मृत्यू
रावेर- तालुक्यातील धामोडी फाट्यानजीक 55 वर्षीय इसमाचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. डिगंबर पाटील (55) असे मयताचे नाव आहे. या घटनेची माहिती कळताच तहसीलदार उषारानी देवगुणे यांनी घटनास्थळी भेट दिली.