स्नेहयात्री कंरडक स्पर्धेतून भुसावळकर रसिकांना मिळाली नाट्यमेजवानी
Bhusawalkar lovers got a theatrical treat from the Snehayatri Kanradak competition भुसावळ : स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे श्री कृष्णचंद्र सभागृहात शनिवारपासून दोन दिवस स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सुरवात झाली. दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत शनिवारी नाट्यस्नेह अमरावती यांनी गेम ही एकांकिका सादर केली. तर पंचमस्नेह, परभणी यांनी अजब-गजब तर रंगरेर्जें जळगाव या संस्थेने पेढे वाटा पेढे, नाट्यरंग थिएटर्स निर्मित दान पावलं आदी नाटकांनी श्रोत्यांची मने जिंकली. रविवारी या नाट्य महोत्सवाचा समारोप झाला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
स्नेहयात्री प्रतिष्ठान आयोजीत स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेचे उद् घाटन दिपनगर औष्णिक केंद्राचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर यांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी व्यासपीठावर जय गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेश नेमाडे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, भारत गृह उद्योग दीपक मसालाचे संचालक विश्वनाथ अग्रवाल या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते घंटानाद करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक करताना स्नेहयात्रीचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडत असताना सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या व आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या नंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पंचमस्नेह,परभणी यांनी अजब – गजब तर रंगरेज जळगाव या संस्थेने पेढे वाटा पेढे या नाटकांनी श्रोत्यांची मने जिंकली.

मान्यवरांच्या हस्ते घंटानाद
स्नेहयात्री करंडक एकांकिका स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते घंटानाद करण्यात आला. उद्घाटन सत्रानंतर सुरवातीला नुपूर भालेराव हिने गणेश वंदना कथक नृत्यातून सादर करून वातावरण निर्मिती तयार केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन गिरीश कुलकर्णी यांनी केली. स्पर्धेला रसिकांना उस्फूर्त प्रतिसाद लाभला. भुसावळकर रसिकांनी स्पर्धेत सादर होणार्या एकांकिकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
