कापूस भरण्यास गाडी न बोलावल्याने कासवा गावातील प्रौढाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


Adult in Kaswa village beaten up for not calling a car to load cotton : Crime against four यावल : तालुक्यातील कासवा या गावात एका 42 वर्षीय इसमाला कापूस भरण्यासाठी गाडी का बोलावली नाही असे सांगत गावातील चौघांनी मारहाण केली. दारूच्या नशेत त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारून दुखापत करण्यात आली. याप्र करणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा
कासवा येथील बापू शांताराम सपकाळे (42) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या घराच्या समोर अंगणात असताना त्या ठिकाणी वसंत झिपरू सपकाळे, शिवा शामराव सपकाळे, सागर शामराव सपकाळे व वसंत सपकाळे यांचा मुलगा (सर्व रा. कासवा) हे आले व त्यांनी सांगितले की, तू कापूस भरण्यासाठी गाडी का बोलावली नाही ? असे सांगून वाद घातला आणि शिवीगाळ करून त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व दारूच्या नशेत वसंत सपकाळे याने त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने बापू सपकाळे यांच्या डोक्यावर वार करीत गंभीर दुखापत केली. तया प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !