ठाकरे गटाला मोठा धक्का : माजी मंत्री सुभाष देसाईंचे चिरंजीव शिवसेनेत


Big blow to Thackeray group : Ex-minister Subhash Desai’s life in Shiv Sena मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा जोरदार धक्का देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत. ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ
जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांनी बंड केले.यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्के देण्यास सुरुवात केली. राज्यातील अनेक पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेत प्रवेशाने खळबळ
माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते मुख्यनेत्यांपैकीही एक नेते आहेत. सुभाष देसाई हे सध्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !