भुसावळात आझादहिंद एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लांबवला


A passenger’s mobile phone was stolen from Azadhind Express at Bhusawal भुसावळ : नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी प्रवाशाकडून मोबाईल घेतल्यानंतर भुसावळातून भामटा पसार झाल्याची घटना आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
शेगाव येथील रहिवासी भूषणकुमार रमेश हांडे हे आझाद हिंद एक्स्प्रेसच्या जनरल डब्याने प्रवास करीत असतांना गाडी भुसावळ रेल्वे यार्डात आल्यावर बुधवारी पहाटे 3.55 वाजता एका प्रवाशाने नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल मागितला व मात्र काही कळण्याच्या आत संशयित मोबाईल घेवून पसार झाला. याप्रकरणी हांडे यांनी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात 30 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीकृष्ण निकम करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !