फैज्पूर भागातील ग्रामीण पत्रकारांनी जाणली विधीमंडळाच्या अधिवेशनाची माहिती
वि.स.पागे समितीचे संचालक निलेश मदाने यांनी चर्चासत्रात केले मार्गदर्शन
फैजपूर : मंत्रालय आणि विधी मंडळ वार्ताहर संघातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांतील, तालुक्यातील पत्रकारांना विधीमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज दाखविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रथमच जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील पत्रकारांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची आणि विधान सभा सभागृहासह विधान परीषदेच्या सभागृहासह सेंटर सभागृह आणि विधी मंडळ वार्ताहर कक्षाची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.
पत्रकारांनी जाणली माहिती
प्रसंगी विधानभवनात वि.स.पागे समितीचे संचालक निलेश मदाने यांनी मार्गदर्शन करून समिती सभागृहात चर्चासत्र आयोजित केले. पत्रकारांना सचिव, उपसचिव दर्जाच्या अधिकार्यांनीदेखील विधानसभा व विधानपरिषद चे कार्याची माहिती करून दिली हा अभ्यास दौरा जेष्ट पत्रकार कमलाकर वाणी यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माध्यमातून आयोजित केला होता. याप्रसंगी सेंटर सभागृहात वरीष्ठ अधिकारी कुटे, आठवले यांनी तिन्ही सभागृहांची सखोल माहिती दिली. येथे एकूण 35 विविध प्रकारच्या समित्या कार्यरत असून यात मुखत्वे अंदाज समिती, लोक लेखा समिती, महामंडळ समिती याची कामकाज पद्धती-उद्देश विशद केला निलेश मदाने यांनी मनोगत व्यक्त केले.

पत्रकारांचे स्वागत
याप्रसंगी मंत्रालय आणि विधी मंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारीणी समवेत फैजपूर येथील पत्रकारांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनाची आठवण सांगून इतिहासाची विस्मृती होता कामा नये, इतिहासाचा धांडोळा घेऊनच पुढे वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन केले आणि या उपक्रमाबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे खास अभिनंदन केले आणि सर्व ग्रामीण पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास मंत्रालय आणि विधी मंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कार्यकारीणी सदस्य कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब तसेच फैजपूर येथील पत्रकार संस्था अध्यक्ष फारुख शेख अमीर, ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, संजय सराफ, राजेंद्र तायडे, राजू तडवी, मयुर मेढे, किरण पाटील, सलीम पिंजारी, गोपीचंद सुरवाडे, संतोष कुल्थे, जफर शेख, अरबाज रवान, मोहसीन शेख, नजमोद्दीन शेख, कमलाकर माळी, प्रभाकर तायडे उपस्थित होते.
