भुसावळात मनसेच्या पाठपुराव्याने दहावीच्या परीक्षार्थीला मिळाला न्याय
In Bhusawal, the 10th examinee got justice due to MNS’s follow-up भुसावळ : दहावी परीक्षेसाठी शुक्रवारी सायन्स भाग एकचा पेपर असल्याने नियोजित वेळी व परीक्षास्थळी निरज पाटील हा विद्यार्थी पोहोचू शकला नाही, या प्रकारामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे पाहून मनसे पदाधिकार्यांनी धाव घेत पोलीस प्रशासन व सेंट अलॉयसीस शाळा प्रशासन तसेच शिक्षण विभागासोबत आक्रमक पवित्रा घेत चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली.
अखेर विद्यार्थ्याला मिळाला न्याय
झाले असे की, शुक्रवारी निरज पाटील हा दहावीचा विद्यार्थी सायन्स एकच्या पेपरासाठी सेंट अॅलायसेस हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर उशिराने दाखल झाला मात्र त्यास परीक्षा देण्यापासून वेळेचे कारण दाखवत मज्जाव करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांनी पुढाकार घेत गटशिक्षणाधिकार्यांना बोलावल्यानंतर या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात आला.