यावल शहरातील श्रीराम नगरातून 20 वर्षीय तरुणी बेपत्ता


A 20-year-old girl is missing from Sriram Nagar in Yaval city यावल : शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणी आपण बोरावल गेट येथे साडी डिझाईनचे काम करण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडली मात्र ती नंतर घरी परतली नाही. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.

घराबाहेर पडलेली तरुणी परतलीच नाही
शहरात सातोद रस्त्यावर श्रीराम नगरातील रुपाली राजू डांबरे (20) ही तरुणी बोरावल गेट भागात राहणारे जाकीर पटेल यांच्या घरी साडी डिझाईनचे काम करण्यासाठी जात असल्याचे सांगून निघाली मात्र घरी परतली नाही. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राहुल डांबरे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !