दहिगावातील प्रौढाची आत्महत्या


यावल : तालुक्यातील दहिगावच्या श्रावण कौतीक सोनवणे यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सोनवणे हे शुक्रवारी रात्री अकरा वाजता आतून दरवाजा बंद करून आपल्या घरात झोपले असता शनिवारी सकाळी बराच वेळ झाला तरी ते न उठल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी आत प्रवेश केला. तेव्हा श्रावण सोनवणे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला असता वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. नामदेव सोनवणे यांच्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !