भुसावळात सिंधी समाजाच्या शोभायात्रेने वेधले लक्ष
भगवान झुलेलाल जन्मोत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम
The procession of the Sindhi community in Bhusawal attracted attention भुसावळ : भगवान झुलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीतून गुरूवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. डीजेच्या तालावर तरुणाईने थिरकत लक्ष वेधले तर दोन हजारांवर समाजबांधवांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला.
सिंधी समाजातर्फे चेट्रीचंड उत्सवानिमित्त गुरुवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील सिंधी कॉलनीमधील झुलेलाल मंदीरापासून गुरुवारी दुपारी शोभायात्रेला सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत उत्साह कायम होता तर शहरातील विविध मार्गावरून शोभायात्रा निघाल्यानंतर सायंकाळी तिचा समारोप करण्यात आला.
दिवसभरात विविध कार्यक्रम
सकाळी समितीचे अध्यक्ष विजय लोकवाणी यांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. पहाटे सहा वाजता शहरामध्ये मॅरेथॉन झाली तर सिंधी कॉलनी पासून ते पांडुरंग टॉकीज असा स्पर्धेचा मार्ग राहिला शिवाय त्यानंतर दुचाकी रॅलीही काढण्यात आली. दरम्यान, शोभायात्रेत अध्यक्ष विजय लोकवाणी, उपाध्यक्ष बालचंद आहुजा, भारतीय सिंधू सभा प्रदेश अध्यक्ष दिनेश दुधानी, माजी नगरसेवक निकी बतरा, मनोहर सोढाई, अॅड.मनीष सेवलानी, अजय माखीजा, अजय नागराणी, रोशन सदवानी, राजकुमार वाघवानी, कैन्हय्या जुमनानी, राजेश सेवलानी, जॅानी मेघानी, जयपाल नागदेव, नवीन छामनानी, संजय आहुजा, दीपक टेकवानी, दीपक टेवानी, गोपाळ कमनानी, शिवा बठेजा, प्रताप सिरवाणी, प्रकाश हसराणी आदी उपस्थित होते. दरम्यान, मिरवणूक मार्गावर भाविकांसाठी 50 ठिकाणी शरबत, खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी शोभायात्रेतील भाविकांना आईस्क्रीमचे वाटप केले.

