मधुकर साखर कारखान्यात दोन हजारांच्या भंगाराची चोरी : आरोपीला सात महिन्यांची शिक्षा
Theft of scrap worth Rs 2,000 in Madhukar Sugar Factory : Accused sentenced to seven months यावल : तालुक्यातील फैजपूर जवळील मधुकर सहकारी साखर कारखान्यात 2018 मध्ये 26 वर्षीय तरुणाने दोन हजारांचे भंगार साहित्य चोरी केले होते. या गुन्ह्यात त्यास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता यावल न्यायालयाने आरोपीला सात महिने कैदेची शिक्षा सुनावली.
आरोप सिद्ध झाल्याने अखेर शिक्षा
फैजपूर शहरातील न्हावी मार्गावर मधुकर सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्यात 4 जुलै 2018 रोजी महेंद्र भागवत कोळी (26, रा.बामणोद) या तरुणाने सुमारे दोन हजार रूपये किंमतीचे लोखंडी पाईपचे भंगार साहित्य चोरी केले होते व या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात निवृत्ती मुरलीधर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ यांनी केला. दोषारोपपत्र यावल येथील न्यायालयात सादर केले असता सह दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे यांच्या न्यायदालनात सरकारी अभियोक्ता अॅड.व्ही.एस.शेळके यांनी फिर्यादी, साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार अलीम शेख यांनी सहकार्य केले. यात महेंद्र भागवत कोळी याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास सात महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
