जळगावातील सेवानिवृत्त महिलेला दोन लाखांचा गंडा


A retired woman in Jalgaon was given a sum of two lakhs जळगाव : जळगावातील सेवानिवृत्त महिलेला अज्ञात भामट्याने एक लाख 90 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात बुधवारी दुपारी चार वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन एक लाख 90 हजारांचा गंडा
सुनंदा बाबूराव तायडे (62, वानखेडे हाऊसिंग सोसायटी, जळगाव) या सेवानिवृत्त असून 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनोळखी नंबरवरून फोन आल्याने भामट्याने नेट बँकींगद्वारे पैसे पाठवायचे असल्याचे सांगून वयोवृध्द महिला आणि तिचा मुलगा विजय बाबुराव तायडे यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे वर्ग करून एक लाख 90 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मुलासह जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !