आई-वडिलांपाठोपाठ पत्नीही गेली : नैराश्याने ग्रासल्याने फुलपाटच्या तरुणाची गिरणा पुलावरून उडी घेत आत्महत्या


Young man commits suicide by jumping from Girnanadi bridge into the riverbed : Dead is a resident of Phulpat धरणगाव : आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर पत्नीचेदेखील निधन झाल्याने खचलेल्या फुलपाटच्या तरुणाने गिरणा पात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. श्याम प्रताप भील (30, फुलपाट) असे मयत तरुणाचे नाव आहे.

वैफल्यग्रस्त अवस्थेत आत्महत्या
श्याम भील हा त्याचा भाऊ भुरा भील याच्यासोबत राहत होता. 10 वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तर कोरोना काळात त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. शिवाय काही महिन्यांपासून तो आजारी देखील होता. वाळूच्या ठेक्यावर तो काही महिन्यांपूर्वी काम करत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर श्याम हा तणावात होता. ही बात लक्षात आल्यानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन जळगाव तालुका पोलिसांना कळविले. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, अनिल फेंगडे, चेतन पाटील होमगार्ड अशोक वाघ यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !