चाळीसगावातील महिलेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार
A woman in Chalisgaon was raped on the lure of marriage चाळीसगाव : तुच माझे प्रेम आहे, तु मला आवडते, मला तुझी सवय झाली असल्याचे म्हणत शहरातील तरुणाने 43 वर्षीय महिलेशी जवळीक वाढवत चार लाख रुपये लुबाडत तिच्यावर चाळीसगावसह सासरी नाशिक येथे वारंवार अत्याचार केला मात्र लग्नाचे नाव काढताच तरुणाने कानावर हात ठेवल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर चाळीसगावातील निरंजन अशोक लदे याच्याविरोधात अत्याचार व फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
विवाहितेचा केला गर्भपात
संशयित निरंजन याने 43 वर्षीय विवाहितेसोबत आधी प्रेमाचे नाटक केले. याच प्रेमातून विश्वास संपादन करत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापीत केले. यातून दिवस गेल्यावर विवाहितेचा श्री समर्थ क्लिनीकमध्ये गर्भपात केला तसेच मला पैशांची अडचण असल्याचे पीडीतेकडून चार लाख रुपये तसेच सोन्याची चैन व अंगठी उकळली.

चार लाख रुपये उकळले
पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार 1998 ते 4 मार्च 2023 दरम्यान संशयित आरोपीने मला माझ्या पत्नीपासून सुख मिळत नाही, मला माझी पत्नी आवडत नाही, माझे तुझ्यावरच प्रेम आहे, अशी बतावणी विवाहितेशी संबंध ठेवले. चाळीसगाव येथील एका ब्युटी पॉर्लरमध्ये, त्याच्या घरी, शेतात आणि पीडीतेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यावर चाळीसगाव येथील एका खासगी दवाखान्यात गर्भपात केला. एवढेच नव्हे तर विवाहितेला आर्थिक अडचण दाखवून तिच्याकडून निरंजन लद्दे याने वेळोवेळी सोन्याची चेन, अंगठी व एकूण चार लाख रुपये देखील घेतले. तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करत आहेत.