आव्हाणा शिवारात आगीमुळे 80 हजारांचा मका खाक
Maize worth 80 thousand lost due to fire in Avhana Shivara जळगाव : इलेक्ट्रीक तारांमध्ये स्पार्किंग होवून ठिणगी शेतात पडल्याने शेतकर्याच्या शेतातील मक्याचे कणीस व कडबा जळाल्याने 80 हजारांचे नुकसान झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणा शिवारात गुरुवारी दुपारी दिड वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
शेतकर्याचे 80 हजारांचे नुकसान
रामकृष्ण हरी पाटील (55, आव्हाणा) या शेतकर्याचे आव्हाणा शिवारात गट क्रमांक 179 मध्ये शेत आहे. गुरुवार, 6 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे ठिणगी शेतात ठेवलेल्या मक्याच्या कणसासह कडबा चार्यावर पडल्याने आग लागली व शेतकर्याचे 80 हजारांचे नुकसान झाले. शेतकर्याने जळगाव तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.
