एरंडोल शहरातील अल्पवयीन तरुणीस पळवले
Kidnapped a minor girl from Erandole town एरंडोल : शहरातील एका भागातील 16 अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार बुधवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फूस लावून पळवले
एरंडोल शहरातील एका भागात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी परीवारासह वास्तव्यास असून बुधवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. पीडीतेा शोध घेवूनही ती न सापडल्याने गुरूवारी एरंडोल पोलिसात पीडीतेच्या पित्याने तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.
