दुचाकी अपघातात जळगावातील वृद्धाचा मृत्यू
Jalgaon old man died in a two-wheeler accident जळगाव : शहरातील 65 वर्षीय वयोवृद्धाचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ 4 रोजी रात्री 10 वाजता घडली होती. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विठ्ठल काशीनाथ गोंधळी (65, मुकुंद नगर, आदित्य हौसींग सोसायटी, जळगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी अपघातात मृत्यू
विठ्ठल गोंधळी हे आपल्या परीवारासह जोशी कॉलनीतील मुकुंद नगरात वास्तव्याला होते व खाजगी कंपनीत सिक्युरीटी गार्ड म्हणून कार्यरत होते. मंगळवार, 4 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील शेतातून दुचाकी क्रमांक (एम.एच.19 सी.के.682) परत येत असतांना अचानक दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुचाकी घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असताना अखेर बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी कुसुंबा पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गोंधळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.
