वीज कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यात नऊ शेळ्यांचा मृत्यू : गुराखी बचावला
Nine goats die in Muktainagar taluka due to lightning strike : Cowherd saved मुक्ताईनगर : मुक्ताईनगरसह परीसरात अचानक झालेल्या वादळी पावसात विजांचा लखलखाट सुरू असताना वीज कोसळल्याने नऊ शेळ्यांचा मृत्यू ओढवल्याची घटना तालुक्यातील रामगड येथे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. या घटनेत सुदैवाने गुराखी बचावला आहे.
गुराखी सुदैवाने बचावला
रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावालगत गेले असता दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने सुरुवात झाल्यानंतर शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्यांचा मृत्यू ओढवला तर अतुल यास किरकोळ दुखापत झाली. गुलाबसिंग बिलाले यांच्या पाच तर तारासिंग बिलाले यांच्या तीन व लटु बिलाले यांची एक शेळी मृत्यू पावली. उचंदे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.
