जळगावातील हॉटेल मॅनेजरकडे धाडसी घरफोडी : साडेचार लाखांचा ऐवज चोरीला


Daring burglary at the hotel manager in Jalgaon : Four and a half lakhs worth was stolen जळगाव : शहरात बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले असून शहरातील विजय कॉलनीतील प्रसाद अपार्टमेंटमध्ये मोठी घरफोडी झाल्याची बाब समोर आली आहे. चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून चार लाख 30 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्लॅट बंद असल्याची साधली संधी
प्रसाद अपार्टमेंटमधील रहिवासी गणेश नारायण व्यास (49, विजय कॉलनी, जळगाव) छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील एका हॉटेलमध्ये संकुल येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहेत. गुरूवारी दुपारी व्यास हे कामावर होते तर कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास व्यास यांचा मुलगा ध्रुव हा घरी आला. त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केल्यानंतर कपाट सुद्धा तुटलेले दिसले. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला. व्यास हे घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले तर आतील खोलीतील कपाट, कपाटातील ड्रॉवर तुटलेले व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे डबे बेडवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. व्यास यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. रात्री व्यास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चोरट्यांनी एक लाख 80 हजारांची रोकड तसेच अडीच लाखांचे दागिने लांबवल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !