पाळीव कुत्र्याच्या कारणावरून दुचाकीधारकाला चौघांकडून मारहाण
जळगाव : पाळीव कुत्रा बसलेला असताना त्याच्या जवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरवल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
शेख सलीम शेख निजाम (52, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने सलीम हा शुक्रवार, 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास आलेले होते. यावेळी ते दुचाकीवरून जात असताना पाळीव कुत्रा घाबरून पळून गेला. या कारणावरून आशिष संजय सोनवणे व त्याच्यासोबत असलेले इतर तीन जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेबाबत शेख सलीम शेख निजाम यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यावरून शुक्रवार, 7 एप्रिल रोजी सायंकाळी वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.
