भुसावळातील कलावंत कल्पना कोल्हेंचे फाळके गोल्डन अॅवॉर्डसाठी नामांकन जाहिर
भुसावळ : मराठी सिनेसृष्टीत सर्वात मानाचा व सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2019 साठी भुसावळच्या कलाकार कल्पना कोल्हे उर्फ रीतीका चव्हाण यांना नामांकन जाहीर झाले आहे . चव्हाण यांना ‘अट्टाहास’ या मराठी चित्रपटात उत्कृष्ट सहकलाकार म्हणून नामांकन जाहीर झाले आहे. सांस्कृतिक व नाट्य चळवळीसह चित्रपटसृष्टीतही शहराने आपला ठसा उमटवला आहे.
प्रतिकुल परीस्थितीतही उमटवला अभिनयाचा ठसा
घरची परीस्थिती अत्यंत प्रतिकूल व हालाखीची असतााही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपली कला व आवड़ जपण्यासाठी त्यांचा जिद्दीने संघर्ष सुरू आहे. नटरंग या चित्रपटात लहानशी भूमिका असो वा गावपातळी वर होणारे छोटे-मोठे प्रयोग अथवा गणेशोत्सव कल्पना कोल्हे या हिरारीने सहभाग घेतात. भुसावळ न्यायालयात काम करुन आपली उपजीविका चालवणार्या या कष्टाळू महिलेच्या परीश्रमाचे चीज झाले असून दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2019 साठी नामांकनाच्या यादीत नाव येणे हीदेखील त्याची
पावतीच म्हणाले. चव्हाण यांनी अभिनय क्षेत्रात, मराठी नाटक, मराठी-हिंदी चित्रपट यासह विविध भाषीय चित्रपटात व नाटकात अनेक भूमिका बजावल्या आहेत. दरम्यान, चव्हाण यांच्या नामांकनासोबतच रोहिणी हट्टंगडी, मेघा घाटगे व दीप्ती धोत्रे या दिग्गज कलाकारांचीही नावे नामांकनात समाविष्ट आहेत. भुसावळच्या
मराठी, हिंदी सिनेमा व नाटकात भूमिका करणार्या कलाकाराची नामांकनासाठी प्रथमच निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.