भुसावळात केबल चालकाला ऑनलाईन 33 हजारांचा गंडा


भुसावळ- : एटीएम सुरू ठेवण्यासाठी एटीएम कार्डावरील कोड सांगण्यास भाग पाडून भामट्याने शहरातील केबल चालकाला ऑनलाईन 33 हजारांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विजय गिरधारी चौधरी (शिवाजी नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत आपबिती कथन केली. पंजाब नॅशनल बँकेत त्यांचे खाते असून बुधवारी दुपारी दोन वाजता त्यांना 9934846128 या क्रमांकावरून कॉल आला. उभयंताने सुरुवातीला तुमचे अ‍ॅक्सीस बँकेतील खाते बंद होत असल्याचे सांगून तसे न करण्यासाठी एटीएमवरील क्रमांक सांगून खाते अपडेट करावे लागेल, असे सांगताच चौधरी यांनी पंजाब नॅशनल बँकेचे खाते सुरू ठेवायचे असल्याचे सांगून एटीएमवरील क्रमांक सांगितला तर काहीच वेळात एकदा खात्यातून 25 हजार व नंतर आठ हजारांची रक्कम भामट्याने लंपास केली. खात्यातील सर्व रक्कम संपल्याचा मेसेज आल्यानंतर चौधरी यांनी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला मात्र संबंधिताचा त्यांचा क्रमांक ब्लॅक लीस्टमध्ये टाकल्याने त्यांनी बँकेत धाव घेतली मात्र संपामुळे त्यांना माघारी परतावे लागले व त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत माहिती दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !