सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात भुसावळात ऑर्डनन्स कर्मचारी संपावर


भुसावळ : केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार संरक्षण क्षेत्रातील एआयडीईएफ व आयएनडीडब्ल्युएफ संलग्न ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन व मजदुर युनियनद्वारे बुधवार, 8 रोजी पहाटे सहा वाजेपासून एक दिवसीय बंदमध्ये कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान, देशभरात राज्य व केंद्रीय असे 25 कोटी कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारची कामगार विरोधी निती, आयुध निर्माणींचे खाजगीकरण, 284 उत्पादन कोअर घोषित करणे, संरक्षण क्षेत्रातील ठेकेदारी बंद करणे, संरक्षण उत्पादनावरील अतिरीक्त भार-सॅलरी बजेट स्वतंत्र करणे, आठ तासांपेक्षा जास्त काम नको, अनुकंपा भरती 100 टक्के करणे, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करने आदी मागण्यांसाठी संरक्षण क्षेत्रात खाजगी कंपन्यांच्या भागीदारीच विरोधात तालुक्यातील भुसावळ व वरणगाव फॅक्टरीसह देशभरातील 41 आयुध निर्माणीत संप करण्यात आला.

भुसावळातील संपात यांचा सहभाग
भुसावळातील ऑर्डनन्स फॅक्टरी गेटवर सकाळपासुन युनियन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामगारांना कामावर न जाण्यासाठी आवाहन केले. त्याला कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपात दीपक भिडे, विक्रम अन्नदाते यांनी संपाची भुमिका मांडली. संयुक्त समितीचे सहसंयोजक किशोर चौधरी, संयुक्त समिती संयोजक तथा आयुध निर्माणी जेसीआय 3 सदस्य बोर्ड सदस्य दिनेश राजगिरे यांच्या नेतृत्वात व एआयडीएफचे उपाध्यक्ष राजेंद्र झा यांच्या मार्गदर्शनात संप यशस्वी करण्यात आला. संपाच्या यशस्वीतेसाठी गिरीष येवले, हिरालाल परीसकर, किशोर पाटील, गजदीश बिंद्रा, नाना जैन, विजय साळुंके, जितु आंबोडकर, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण बोहित, एम.एस.राउत, किशोर बढे, दीपक वाघ, प्रकाश नेमाडे, नितेश तायडे, विनोद तायडे, सूर्यभान गाढे, राजु तडवी यांच्यासह ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन, मजदुर युनियनचे पदाधिकारी, कामगारांनी सहभाग नोंदविला. सहयोगी एससीएसटी असोसिएशनने या संपाला पाठिंपा दिला. फॅक्टरी प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

तहसील कर्मचारीही संपावर
भुसावळ- केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरण व जनेतच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात बुधवार, 8 जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संपाची हाक दिली. या भुसावळसह परीसरातील कर्मचारी संपात सहभागी झाले. तहसील कार्यालयातील 45 कर्मचारी संपात सहभागी झाले. तहसीलदार दीपक धीवरे व शिपाई कार्यालयात उपस्थित होते. यामुळे तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. यामुळे तहसीलमध्ये काम घेवून आलेल्या नागरीकांना अडचणींना समोरे जावे लागले. तालुक्यातील सर्वच तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागातील तीन कृषी विस्तार अधिकारी संपात सहभागी झाले. गटविकास अधिकारी विलास भाटकर सह सर्वच विभागातील कर्मचारी व ग्रामसेवक या संपात सहभागी नव्हते.

खाजगी बँकांमध्ये व्यवहार ठप्प
शहरातील विविध बँकांच्या कर्मचार्‍यांनीही संपात सहभाग नोंदविला. स्टेंट बँकेतील व्यवहार मात्र सुरळीत असल्याचे सांगण्यात आले. खाजगी बँका बंद असल्यामुळे ग्राहकांचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्यांना अडचणींचा सामोरे जावे लागले. जि.प. व न.पा. शाळा संपात सहभागी नाहीत तर 56 खाजगी प्राथमिक व 66 खाजगी माध्यमिक शाळांचे शिक्षक संपात सहभागी झाले होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !