कानबाई विसर्जन मिरवणुकीत कोळपिंप्रीच्या इसमाचा हृदयविकाराने मृत्यू
कोळपिंप्री : कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू असताना प्रमोद पुंडलिक काटे (42) यांना 12 रोजी दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचां मृत्यू झाला. काटे हे कामानिमित्त सुरतला स्थायीक झाले होते. कानबाईच्या कार्यक्रमासाठी ते शनिवारी कोळपिंप्री येथे आले होते तर गावात कानबाईची विसर्जन मिरवणूक सुरू असताना काटेदेखील त्यात सहभागी झाले होते. नाचताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना अमळनेर येथील रुग्णालयात हलवत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.