भुसावळ शहरातील विवाहितेचा विनयभंग


molestation  of married woman in Bhusawal city भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील एका भागातील 36 वर्षीय महिलेच्या मोबाईलवर टेक्स मेसेज सातत्याने करून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 10 जून 2022 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी अनोळखी विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईलवर मेसेज पाठवून मनस्ताप
36 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, 7758023416 या मोबाईलधारकाने विवाहितेच्या मोबाईलवर तसेच पतीसह जेठाणीच्या मोबाईलवर सातत्याने मेसेज करून विवाहितेचा पाठलाग करीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर 7758023416 मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक अर्चना अहिरे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !