चितोडा गावातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता


यावल : तालुक्यातील चितोडा येथून 19 वर्षीय तरुणी आपण मंदिरात जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडली मात्र सायंकाळ झाल्यानंतरदेखील घरी परतली नाही. तिचा सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.

मंदिरात दर्शनासाठी गेली मात्र परतलीच नाही
चितोडा येथील रहिवासी गायत्री राजेंद्र धांडे (19) ही तरुणी सकाळी आंघोळ करून मंदिरात दर्शनासाठी जात आहे, असे सांगून घराच्या बाहेर गेली. मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली मात्र 19 वर्षीय गायत्री धांडे ही कुठेच मिळून आली नाही. 19 वर्षीय तरुणी मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात संजय लक्ष्मण धांडे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !