हिंगोणा येथून 22 वर्षीय तरुणी झाली बेपत्ता
यावल : तालुक्यातील हिंगोणा येथील 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. घरात कोणाला काही न सांगता ही तरुणी बाहेर गेली मात्र नंतर ती परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.
कुणाला न सांगता तरुणी बेपत्ता
हिंगोणा, ता.यावल येथील करीष्मा आमिन तडवी (22) ही तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही. सायंकाळ झाली तरी ही तरुणी परत न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास करण्यात आला मात्र ही तरुणी कुठेच मिळून आली नाही. तरुणी कुठेच मिळून न आल्याने जलदार नामदार तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक बाळू भोई करीत आहे.
