मस्कावदला भीषण आग, दुचाकीसह गुरांचा चारा खाक
Fierce fire at Maskavad , two-wheeler and cattle fodder destroyed खिर्डी : येथून जवळच असलेल्या मस्कावद येथे गुरे बांधलेल्या खळ्यात अचानक शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत पाहता-पाहता आगीचा भडका वाढल्याने दुचाकीसह गुरांचा चारा जळून खाक झाल तर सुदैवाने गुरांना वाचवण्यात यश आले. या आगीत शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची भीती आहे.
आग विझवण्यासाठी ग्रामस्थांची धडपड
मस्कावद गावातील शेतकरी जितेंद्र चौधरी व सोपान तेली यांनी गुरांसाठी खळा बांधला असून त्यात मोठ्या प्रमाणावर शेती साहित्यासह गुरे बांधलेली होती. सोमवारी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने खळ्यात आग लागली व त्यात चार्याचा कूट, ठिबक नळ्या, पाईप, लाकडे तसेच दुचाकी खाक झाली मात्र सुदैवाने ग्रामस्थांना गुरे वाचवण्यात यश आले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत शेजकर्यांचेे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती आहे.
