ओएलएक्स अॅप्सवर टेबल खरेदीच्या नावाने डोंगरकठोर्याच्या तरुणीला दोन लाखांचा गंडा
Dongarkathora girl extorted two lakhs in the name of buying a table on OLX apps यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील एका तरुणीची ओएलएक्सवर टेबल खरेदीच्या नावाने एकाने संपर्क साधला व ऑनलाईन पेमंट टाकले जात नाही, असा बनाव करीत तरुणीकडून काही पैसे ऑनलाइन मांगवले व नंतर तिची तब्बल एक लाख 80 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पैसे खात्यावर मागवत केली फसवणूक
डोंगरकठोरा, ता.यावल येथील एका तरुणीने आपल्या घरातील एका जुना टेबल ओएलएक्सवर विक्री करीता टाकला होता व त्याची किंमत आठ हजार रुपये ठेवण्यात आली. तरुणीला कर्नाटक राज्यातून एकाने संपर्क करीत टेबल मी विकत घेत आहे व तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगितले मात्र नंतर संशयिताने तुमच्या खात्यावर पैसे जात नाही असे सांगत तरुणीस तुम्ही माझ्या खात्यावर काही पैसे टाका, असे सांगितले व तरुणीने तसे केल्यानंतर तरुणीच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख 80 हजार रुपये लांबवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तरुणीने बँक खाते ब्लॉक केले व या प्रकरणी ऑनलाईन फसवणुकीची तक्रार यावल पोलिसात नोंदवली. ऑनलाईन दाखवले जाणारे आमिष तसेच कुठली ही लिंक आपण आपल्या मोबाईल मध्ये ओपन करून नये, कुणालाच ओटीपीसह इतर कोड देवू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे.
