उंटावद येथे एकाने जनरल स्टोअरचे दुकान जाळले : अडीच लाखांचे नुकसान


यावल : तालुक्यातील उंटावद येथील मुख्य चौकात असलेल्या एका जनरल स्टोअर दुकानाला गावातीलच एकाने आग लावली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने नागरीकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर बरेच साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अडीच लाखांचे नुकसान
उंटावद, ता.यावल येथील योगेशकुमार अनिल पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे गावात मुख्य चौकात श्रीराम जनरल स्टोअर आहे. त्यांच्या या दुकानात येवुन गावातील अप्पा गुलाब भिल हा नेहमीच वाद घालायचा व भांडण करीत होता व सोमवारी योगेशकुमार पाटील यांनी रात्री दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले. मध्यरात्रीच्या जवळपास गावातील अप्पा गुलाब भील याने त्यांच्या दुकानाला आग लावुन पेटवून दिले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत त्यांचे दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी यावल पोलिसात आप्पा भील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !