भुसावळ शहरात धावत्या रेल्वेखाली जामनेरच्या प्रौढाची आत्महत्या
Jamner adult commits suicide under running train in Bhusawal city भुसावळ : धावत्या रेल्वेखाली उडी घेवून जामनेर तालुक्यातील हिवरखेडे येथील 53 वर्षीय प्रौढाने आत्म्मत्या केली. मंगळवारी ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
प्रकाश धोंडू जैयनकार (53) असे मयताचे नाव आहे. प्रकाश जैयनकार हे भुसावळातील त्यांच्या भाच्याकडे भेटीला आले होते व 16 रोजी घरी चाललो असल्याचे सांगून निघाले होते मात्र रेल्वेखाली आल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.
