भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची सोशल मिडीयातून बदनामी : राजकीय पदाधिकार्‍याच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा


Defamation of Bhusawal MLA Sanjay Savkare on social media : Crime against political office worker भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी शहरातील एका राजकीय पदाधिकार्‍यांचा कार्यकर्ता असलेल्या बबलू खान विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आक्षेपार्ह मजकूर टाकत बदनामीचा आरोप
तारकेश्वर प्रकाश राणे (35, माऊली नगर, विकास कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) यांनी मंगळवारी बाजारपेठ पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, संशयित बबलू खाने याने त्याच्या फेसबुक पेजवरून टक्केवारीबाबत आमदारांविषयी अपशब्द वापरले. आमदारांबाबतचा हा मजकूर फेसबुकवर टॅग करीत आमदारांची राज्यासह शहरात बदनामी केली. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी भादंवि 500 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !