भालोदच्या तरुणाला सासू-सासरे, शालकाची मारहाण
यावल : तालुक्यातील भालोद येथे एका 30 तरुणास त्याच्या सासू-सासर्यांसह शालकाने मारहाण केली. पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
भालोद, ता.यावल येथील संतोष भगवान भालेराव (30) या तरुणाने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पती-पत्नीचा आपसात घरगुती वाद झाला होता व या वादातून त्यास जितेंद्र त्र्यंबक भालेराव, माया जितेंद्र भालेराव, राहुल जितेंद्र भालेराव व गौरव राजू भालेराव या सासु-सासरे व शालकाकडून मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे तरुणाला जबर दुखापत झाली. या प्रकरणी फैजपूर पोेलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहे.





