यावल कृउबा निवडणूक : शंभर जणांची माघार ; 41 उमेदवार रींगणात


यावल : यावल बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माघारीच्या मुदतीत 18 जागेकरीता प्राप्त 141 अर्जातून तब्ब्ल शंभर जणांनी माघार घेतली तर आता 18 जागेकरीता 41 उमेदवार रींगणात आहेत. युती व आघाडीची सरळ लढत होणार असुन दोघांचे पॅनल गठीत करून उमेदवार निश्चित झाले व सारखे चिन्ह मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

41 उमेदवार निवडणूक आखाड्यात
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 18 जागांसाठी 141 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते तर गुरूवारी माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण शंभर उमेदवारांनी माघार घेतली. माघारीनंतर आता 41 उमेदवार रींगणात असून यात भाजपा व शिंदे गट सेना यांच्या युतीचे पॅनल तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गट सेनेचे महाविकास आघाडीचे पॅनल जाहिर करण्यात आले व दोन्ही पॅनलकडून सारखे चिन्ह मिळावे म्हणून अर्ज सादर करण्यात आला आहे. शुक्रवारी चिन्ह प्राप्त होणार आहे. एकूण येथे दोन पॅनलमध्ये सरळ लढत निश्चित झाली असून शनिवारनंतर प्रचाराला सुरवात होणार आहे व 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !