भरधाव दुचाकी सूचना फलकावर आदळली : राजूरचा युवक ठार ; दोघे गंभीर


Speeding two-wheeler hits notice board : Youth of Rajur killed ; Both serious बोदवड : ट्रीपलशीट दुचाकीवरून जाताना नियंत्रण सुटलेली दुचाकी रस्त्यावरील सूचना फलकावर आदळल्याने राजूरच्या 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात नाडगाव ते मुक्ताईनगर रोडवरील हिंगोणा फाट्याजवळ बुधवारी रात्री 1.30 वाजता घडली. या अपघातात शरद भास्कर लुटे (35, राजूर, ता.बोदवड) या युवकाचा मृत्यू झाला. स्वतःच्या मृत्यूस व अपघातास जवाबदार ठरल्याप्रकरणी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघे गंभीर जखमी
बुधवार, 19 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शरद भास्कर लुटे हा तरूण त्याचे मित्र प्रशांत मोहन चौधरी (35) आणि प्रवीण भास्कर लुटे (30) असे तिघेजण दुचाकीने नाडगाव ते मुक्ताईनगर दरम्यान असलेल्या हिंगणेफाट्याजवळून जात असतांना चालक शरद लुटे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरील सुचना फलकावर दुचाकी आदळली. या अपघातात शरद लुटे हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला भाऊ प्रवीण लुटे आणि मित्र प्रशांत चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात बाळू जुलालसिंग पाटील (35, राजूर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !