यावल पालिकेतही तीन विषय समित्यांवर महिलांची वर्णी
यावल : विषय समिती सभापतींची निवडीसाठी गुरुवारी झालेल्या सभेत तीन जागांवर महिलांची वर्णी लागली. समित्यांवर श्री महर्षी व्यास शविआ व शहर विकास आघाडीचे वर्चस्व राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जितेंद्र कुंवर उपस्थित होते. समित्यांमध्ये कॉँग्रेस व श्री महर्षी व्यास शविआकडून प्रत्येक दोन आणि शहर विकास आघाडी कडून एक असे सदस्य होते. दुपारी 12 वाजता पालिकेच्या सभागृहात सर्व चार समित्यांवर सभापतींची बिनविरोध निवड झाली. मुख्याधिकारी बबन तडवी, विजय बढे व कर्मचार्यांनी कामकाज पाहिले. सभेत प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, गटनेता अतुल पाटील, नगरसेेवक प्रा. मुकेश येवले, अभिमन्यू चौधरी, शेख असलम, समीर मोमीन यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
विषय समिती सभापती असे- सार्वजनिक बांधकाम समिती सभापती- देवयानी महाजन, शिक्षण समिती सभापती- रुख्माबाई भालेराव-महाजन, आरोग्य वैद्यक व स्वच्छता समिती सभापती- सैय्यद युनूस सैय्यद युसुफ, महिला विकास व बालकल्याण समिती सभापती- नौशाद मुबारक तडवी, पाणीपुरवठा जलनिसाःरण समितीवर पदसिध्द सभापती :- (प्र.नगराध्यक्ष) राकेश कोलते यांची निवड करण्यात आली.


