भोरगाव लेवा पंचायतीच्या नूतन संचालकपदी भुसावळचे नितीन धांडे
Nitin Dhande of Bhusawal has been selected as the new director of Bhorgaon Lewa Panchayat भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभागाच्या भुसावळ शरखेत नूतन संचालकपदी भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन बाबूराव धांडे यांची निवड करण्यात आली तसेच चेतन सुहास पाटील (भुसावळ), अनिल रामचंद्र वराडे (घाणखेड), स्वाती प्रवीण भोळे (सुनसगाव) यांचीही संचालकपदी नेमणूक करण्यात आली असून त्याबाबतची माहिती कुटुंब नायक रमेश पाटील यांनी दिली.
नूतन संचालकांना दिले नियुक्तीपत्र
यावेळी आरती चौधरी उपस्थित होत्या. नूतन संचालकांना नियुक्ती पत्रक देण्यात आले. लिलाई हॉलमध्ये यापुढे भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेची बैठक घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील व सचिव डॉ.बाळू पाटील यांनी कळविले आहे. दैनंदिन कामकाज निसर्ग प्लाझा, लेवापाटीदार पतसंस्था जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज शेजारी येथे होणार आहे.

