मुक्ताईनगरात पुन्हा गुटख्यावर मोठी कारवाई : चारचाकी वाहनातून पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त
Big crackdown on Gutkha again in Muktainagar : Gutkha worth two lakh seized from four-wheeler मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पुन्हा चारचाकी वाहनातून होणारी गुटख्याची तस्करी रोखत पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. कर्की सीमा तपासणी नाक्यावर ही कारवाई शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी विजय प्रल्हाद कचरे यांच्या फिर्यादीनुसार, कर्की सीामा तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री मारोती (एम.एच.27 एच.2167) ही आल्यानंतर तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला एक लाख 73 हजार रुपये 640 रुपये किंमतीचा गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला शिवास 30 हजार रुपये किंमतीची चारचाकी जप्त करण्यात आली. एकूण दोन लाख तीन हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.
