कोळवदच्या 28 वर्षीय विवाहितेला पती व सासूची मारहाण
A 28-year-old married woman from Kolvad was beaten up by her husband and mother-in-law यावल : तालुक्यातील कोळवद येथील 28 वर्षीय विवाहितेला घरगुती भांडणातून पतीने व सासूने मारहाण केली. यात विवाहितेच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी यावल पोलिसात पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
कोळवद, ता.यावल येथील सारीकाबाई भरत सूर्यवंशी (28) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, घरी असतांना त्यांच्या सासू संगीता भास्कर सूर्यवंशी यांनी विवाहितेचे पती भरत भास्कर सूर्यवंशी यांना सांगितले की तुझी पत्नी घरातले कामकाज करत नाही. याचे वाईट वाटून त्यांच्या पतीने चामडी पट्ट्याने त्यांना मारहाण केली नंतर लोखंडी कडे त्यांच्या डोक्यात मारून त्यांना डोक्यात दुखापत केली व घरातून बाहेर हाकलून दिले.
विवाहिता आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना घेवून जात असतांना त्यांच्या सासूने मुलांना हिसकावून घेतले आणि विवाहितेला मारहाण केली व तिला धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.
