भुसावळात विवाहितेचा जुन्या वादातून विनयभंग : पतीसह सात संशयीतांविरोधात गुन्हा


Molestation of married woman due to old dispute in Bhusawal : Case against seven suspects including husband भुसावळ : कौटुंबिक वादानंतर पतीकडे नांदावयास शहरात आलेल्या विवाहितेची छेडखानी करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना 32 खोली भागात मंगळवार, 18 रोजी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात पतीसह सात संशयितांविरोधात विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील 28 वर्षीय विवाहितेचे पतीशी पटत नसल्याने त्या माहेरी आल्या होत्या व पतीने या संदर्भात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर निकाल लागल्यानंतर विवाहिता सासरी नांदण्यासाठी आल्या मात्र संशयीत पतीसह घरातील अन्य सदस्यांनी विवाहितेची छेडखानी करीत विनयभंग केला व वाढलेला वाद सोडवण्यासाठी पीडीतेची आई आल्यानंतर तिच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची पोत तोडून संशयीतांनी नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पती मोहम्मद रीयाज शेख याकूब, शेख रफिक शेख याकूब, शेख कामरान शेख रफिक, रूकय्या बी.शेख रफिक, सदफ मोहम्मद रीयाज, फैमीदा शेख फारूख मन्यार, नशीन शेख रफिक मन्यार, शेख फारूख शेख याकुब (सर्व रा.32 खोली, उमर मशिदसमोर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !