The Shinde government in the state will collapse at any momen राज्यातील शिंदे सरकार कुठल्याही क्षणी कोसळणार ! : भुसावळात आमदार एकनाथराव खडसे यांच्या दाव्याने खळबळ


The Shinde government in the state will collapse at any momen t! : MLA Eknathrao Khadse’s claim stirs excitement in Bhusawal भुसावळ : राज्यातील शिंदे सरकारने शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही शिवाय सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गारपीटीचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत हे शेतकर्‍यांचे दुर्दैव असून हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार असल्याची स्पष्टोक्ती आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी शुक्रवारी रात्री येथे केली. भुसावळ बाजार समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील वांजोळा रोडवरील मौर्या मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार सावकारे यांच्यावर टिका करताना खडसे म्हणाले की, मी निधी देणार नाही, अशी अफवा पसरवली जात आहे मात्र मी आगामी सहा वर्षांसाठी आमदार असल्याने विकासकामांसाठी निधी देणार असल्याने चिंतेचे कारण नाही. सत्ताधारी आमदारांमधील असंतोष वाढू नये म्हणून मंत्री मंडळ विस्तार करण्यात आलेला नाही, अशी टिकाही त्यांनी केली.

धमक्या देवून कृउबात उमेदवार केले उभे : संतोष चौधरी
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, मी व खडसे एकत्र आल्याने भविष्यात शहरातील दडपशाही संपणार आहे. कृउबा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते ठेकेदार आहेत. त्यांनाही धमक्या देवून उभे करण्यात आले आहेत, तुमचे ठेके बंद करू, अशा धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काळात 60 लाखातून बाजार समितीत काळ्या मातीवर काँक्रिटीकरण झाले ते अद्याप टिकून आहे मात्र शहरासह तालुक्यात कोट्यवधी खर्चून सहा महिन्यात रस्ते खिळखिळे झाल्याचे ते म्हणाले. बाजार समितीत चार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो मात्र प्रत्यक्षात एक कोटींची कामे झाली नाहीत त्यामुळे चार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हास्यास्पद आहे.

तर विधानसभेतही आमदार बदलणार
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, कृउबा निवडणूक ही आमदारकीची चाचणी आहे. या निवडणुकीतील निकालावर आगामी निवडणुकांचे यश अवलंबून असून विधानसभेतही आमदार बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, आशिक खान शेर खान, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे (फेकरी), नितीन धांडे, सर्व उमेदवार उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !