तळवेलच्या वृद्धास भरधाव लक्झरीने चिरडले : चालक पाठलागाअंती ताब्यात


Talvel’s elderly crushed by speeding luxury : Driver arrested after chase भुसावळ : सायकलीवरून घराकडे निघालेल्या वयोवृद्धास भरधाव लक्झरीने चिरडल्याची संतापजनक घटना तळवेल शिवारातील हॉटेल आमंत्रणसमोर रविवारी रात्री आठ वाजता घडली. अपघातानंतर बेपर्वा लक्झरीचालक पसार झाला मात्र नशिराबादजवळील टोल नाक्यावर नशिराबाद पोलिसांनी चालकाच्या मुसक्या बांधल्या. लक्झरीने चिरडल्याने सुकलाल शेनफडू वाघ (60, तळवेल) यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्झरी चालक शुभम श्रीराम पाटील (रा.दापोरा, ता.शहापूर) यास गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आला.

भरधाव लक्झरीने उडवताच वृद्धाचा मृत्यू
सुकलाल शेनफडू वाघ (60, तळवेल) हे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सायकलीने राष्ट्रीय महामार्गावरून घराकडे निघाले असता तळवेल शिवारातील हॉटेल आमंत्रणसमोर भरधाव लक्झरी (एम.पी.68 पी.2777) ने वाघ यांना धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाची अवस्था अत्यंत छिन्नविच्छीन्न झाली होती. अपघातानंतर बेपर्वा लक्झरी चालकाने सुसाट वेगाने लक्झरी जळगावच्या दिशेने दामटली तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांना नशिराबाद पोलिसांना सूचित केल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यावर लक्झरी ताब्यात घेण्यात आली तसेच चालकाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

अपघातानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक परशूराम दळवी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातप्रकरणी दिनेश मदन बोहरे (32, सुशील नगर, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव, दर्यापूर शिवार, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. मयत वाघ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नात, नातू असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !