भुसावळात महिलेने 70 हजारांची रोकड असलेली बॅग लांबवली


In Bhusawal, the woman held out a bag containing 70 thousand in cash भुसावळ : शहरातील आठवडे बाजारातील न्यु एरीया वॉर्डातील अमित अनंत वैषपायन यांनी दुकानाच्या काऊंटरवरून 70 हजारांची रोकड असलेली बॅग महिलेने लांबविल्याची घटना शुक्रवार, 21 रोजी दुपारी 1.30 वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्राहक बनून आलेल्या महिलेचा प्रताप
आठवडे बाजारातील न्यू एरीया वॉर्डात अमित वैषपायन यांचे कोल्ड्रीक्सचे दुकान असून दुकानात एक 35 वर्षीय महिला आली. पाण्याची बाटली घेतल्यानंतर चार आईसस्क्रीम घेतले. यावेळी ग्राहक बनून आलेल्या महिलेने दोन हजार रुपयांची नोट दिल्यानंतर सुटे पैसे नाही, तुम्ही सुटे पैसे द्या, असे दुकानदार महिलेने सांगितले मात्र सुटे नसल्याचे ग्राहक महिलेने सांगितले. यावेळी दुकानदार महिलेच्या मुलाचे तेथील बॅगेत पैसे होते, त्यातील दोन हजार रुपयांचे सुटे पैसे काढले, यावेळी ग्राहक महिलेसोबत असलेल्या एक व्यक्ती व त्या महिलेने आईसस्क्रीमची दुसरे फ्लेवर दाखवा असे सांगितले. महिला आईसस्क्रीम शोधत असतांना हीच संधी साधत दुकानाच्या काऊंटरवर ठेवलेली बॅग लांबविली. यावेळी बॅगेत 70 हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोराीचा गुन्हा शुक्रवारी रात्री दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !