भुसावळातील रेल्वे स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव यांना मारहाण : कर्मचार्याविरोधात गुन्हा
Bhusawal Railway Station Master Manoj Srivastava assaulted : Crime against employee भुसावळ : शहरातील रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव यांना स्थानकावरील रेल्वे कर्मचारी सिध्दार्थ कांबळे यांनी मारहाण केल्याी घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडल्याने रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे कर्मचार्याविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीने रेल्वे वर्तुळात खळबळ
रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास येथील रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात दोन महिला बॅटरी कारबाबत चौकशीला आल्या होत्या. त्यावेळी श्रीवास्तव यांनी उपस्टेशन मास्तर यांच्याकडे त्या महिलांना नेत तेथे तक्रार दूर होईल, असे सांगितले. यावेळी सिध्दार्थ कांबळे हा तेथे असतांना श्रीवास्तव यांनी त्यास तुझ्याबद्दल तक्रारी वाढत आहे. तु ड्युटी बदल कर असे सांगितल्याने त्याचा राग येऊन सिध्दार्थ याने श्रीवास्तव यांच्या डोळ्याजवळ बुक्का मारला. यात ते जखमी झाले. याप्रकरणी श्रीवास्तव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिस ठाण्यात कांबळे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल बच हे पुढील तपास करीत आहे.
