भुसावळ शहरातून भर दिवसा दुचाकी लांबवली


भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून जवाहर डेअरीजवळील बाबा फर्म येथून चोरट्यांनी 28 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा लांबवली दुचाकी
सुधीर सुमीरन साहनी (भुसावळ) यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.ए.6980) ही बाबा फर्म येथे लावली असता चोरट्यांनी शुक्रवार, 21 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ती लांबवली. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !