दगडीसह मनवेल व थोरगव्हाणला वीज चोरी : सहा जणांविरोधात यावल पोलिसात गुन्हा


Electricity theft to Manvel and Thorgavan along with Dagdi: Yaval police registered a case against six people यावल : तालुक्यातील साकळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या वतीने साकळी कक्ष अंतर्गत दगडी, मनवेल व थोरगव्हाण या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यात सहा जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
साकळी, ता.यावल येथील विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांनी पथकासह मनवेल या गावात वीज चोरी विरूध्द धडक मोहिम राबवली. यामध्ये छगन पुंडलिक पाटील व दिलीप पांडुरंग भालेराव हे दोन जण वीज चोरी करतांना आढळले तसेच दगडी या गावात विनायक उखर्डू कोळी व सुनील पांडुरंग कोळी हे दोन जण तर थोरगव्हाण या गावात रामसिंग बंडू भालेराव व दिलीप वसंत भालेराव हे दोन जण असे तीन्ही गावात सहा जण वीज चोरी करतांना आढळल्यानंतर संबंधिताना चोरी केलेल्या युनिटनुसार दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र या सहा जणांनी दंड न भरल्याने या सर्व सहा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !