मन्यारखेडा गावातील अल्पवयीन तरुणीस पळवले
A minor girl from Manyarkheda village was abducted भुसावळ : तालुक्यातील मन्यारखेडा गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना 23 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन तरुणी मन्यारखेडा येथे आपल्या कुटूंबासह वास्तव्यास असून 23 रोजी रात्री 10 ते सोमवारी 24 रोजी सकाळी पाच वाजेदरम्यान अज्ञाताने अल्पवयीन तरुणीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी तरुणीच्या पित्याने वरणगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
