किनगावात वीज चोरी : चौघांविरोधात गुन्हा दाखल
Electricity theft in Kingaon : Case registered against four यावल : तालुक्यातील किनगाव येथे विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. गावातील चार जण वीज चोरी करतांना आढळून आल्यानंतर चौघांना चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकार नोटीस देण्यात आली मात्र या चौघांनी दंड न भरल्याने चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
किनगाव, ता.यावल येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता पंकज कांबळेसह हबीब तडवी, हमीद तडवी, गणेश धनगर, पवन पाटील, दीपक तडवी, गणेश कोळी, दीपक नेवासकर यांच्या पथकाने गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये त्यांना सदाशीव नथ्थु साळुंखे, नीळकंठ तुळशीराम पाटील, संजय पंढरी धनगर व सुरेश भाऊराव पाटील हे चार जण वीज चोरी करतांना आढळून आले. चौघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंडाची रक्कम आकारून नोटीस देण्यात आली व वेळेत दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र या चौघांनी दंड न भरल्याने या चार जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता पंकज कांबळे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे.
